भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी ‘या वर्षीचा स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येत आहे, तसं तसं मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तेच करून ‘हर घर तिरंगा’ साजरा करण्यात माझ्याबरोबर सामील व्हा आणि हो, तुमचे सेल्फी https://harghartiranga.com वर शेअर करा,” असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सर्व प्रथम hargarhtiranga.com वेबसाइटवर जा.
होमपेजवर ‘सहभागी होण्यासाठी क्लिक करा’ टॅब असेल.
हा टॅब तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर, राज्य आणि देश प्रविष्ट करण्यास सांगेल.
3. माहिती लिहिल्यानंतर, प्रतिज्ञा काळजीपूर्वक वाचा – “मी शपथ घेतो की मी तिरंगा फडकावीन, आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि शूर पुत्रांच्या आत्म्याचा सन्मान करीन आणि भारताच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करीन.”
4. एकदा तुम्ही हे केल्यावर, ‘Take Pledge’ वर क्लिक करा आणि तुम्हाला एका पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्ही तिरंगासोबत तुमचा सेल्फी अपलोड करू शकता.
जेव्हा पोर्टल तुम्हाला साइटवर प्रतिमा वापरण्याची परवानगी विचारेल तेव्हा सबमिट करा क्लिक करा. एकदा हे पूर्ण झाल्यावर, तुम्ही Generate Certificate वर क्लिक करू शकता आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत तुमचा सहभाग सिद्ध करू शकता.