X

शासन निर्णयातील ठळक बाबी…

शासन निर्णयातील ठळक बाबी…

1️⃣ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एकजण सेवानिवृत्त किंवा डीएड, बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यास परवानगी

2️⃣ निवृत्त शिक्षकाचे वय ७० पर्यंत असावे, तो मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा, त्यांची कोणतीही चौकशी प्रलंबित नसावी

3️⃣ निवृत्त शिक्षकाची नेमणूक करताना त्यास ज्या गटासाठी घ्यायचे आहे, त्या गटाला सेवाकाळात त्यांनी अध्यापन केलेले असावे

4️⃣ कंत्राटी निवृत्त शिक्षक तीन वर्षांपर्यंत नेमला जावा किंवा त्यांचे वय ७० होईपर्यंतच नियुक्ती करावी, तो शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा

5️⃣ डीएड, बीएड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देता येईल, पण त्यास कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे अधिकार नसतील

6️⃣ डीएड, बीएडधारक बेरोजगार उमेदवारास सुरवातीला एकाच वर्षासाठी नेमणूक द्यावी, त्यानंतर योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर कालावधी वाढविण्याची संधी

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..