ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. राज्यात शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 11 हजार पदांवर भरती करण्यात आली असून, उर्वरित रिक्त पदांवर येत्या काळात भरती करण्यात येणार आहे. TET परीक्षा वर्षातून दोनदा घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे टीईटी कधी होणार याकडे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.