▪️योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
▪️लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
▪️(लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,जन्म दाखला या
▪️चारपैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणेअनिवार्य)
▪️पिवळे/केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो,जवळच्या नातेवाइकांचा मोबाइल क्रमांक, योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज कसा , कोठे कराल?
▪️पोर्टल, मोबाइल अॅप /सेतू सुविधा केंद्राद्वारे या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरला जाऊ शकतो.
▪️पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
▪️ज्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल,त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
▪️लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक.
▪️वय वर्षे ६० आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक.
▪️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.