मोदी आवास योजनेंतर्गत पात्र असलेले मात्र गतवर्षी लाभ न मिळालेले लाभार्थी, तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभा निश्चित करेल. घरकुलांसाठी संबंधित पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवही उतारा किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, मनरेगा जॉबकार्ड, लाभार्थ्याच्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत आदी कागदपत्रे. या योजनेंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे विहित मुदतीत अर्ज करावा.
काय आहे मोदी आवास योजना?
नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी शासनाने मोदी आवास योजना इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी अमलात आणली आहे. याअंतर्गत एक लाख २० हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थ्यास किमान २६९ चौरसफूट इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
हेही वाचा >> मुलाखतीत नक्कीच मिळेल यश! या सात गोष्टी लक्षात ठेवा