X

योजनेसाठी पात्रता

योजनेसाठी पात्रता

● या योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असणे गरचेचे आहे.

● तसेच विद्यार्थी हा ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

● विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

● या योजनेसाठी पात्र विद्यार्थी हे शैक्षणिक मेरीटनुसार निवडले जातील.

विद्यार्थ्यांना दिले जाणारे भत्ते हे विविध प्रदेशांनुसार बदलतात. मुंबई, पुणेसह इतर शहरांसाठी एकूण 60 हजार रुपयांची मदत मिळते. तसेच नगरपालिका क्षेत्रांसाठी एकूण 51,000 रुपयांची मदत व जिल्हा किंवा तालुका स्थानावर विद्यार्थी शिक्षण घेत असल्यास एकूण 43,000 रुपयांची मदत दिली जाते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

● आधार कार्ड
● ज्या शाळेत / महाविद्यालयात शिकत आहे तेथील नोंदणीचा पुरावा
● विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक पासबुक
● वार्षिक उत्पन्नाचा पुराव
● विद्यार्थ्याच्या 10 वी 12 वी इयत्तेचे प्रमाणपत्र

असा करा अर्ज

योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या योजनेचे अर्जाबाबत तुम्ही महाडीबीटी वेबसाइटवर किंवा इतर मागासवर्गीयांसाठी बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयात जाऊन माहिती जाणून घेवू शकता. अर्ज करण्याआधी योजनेचे तपशील तपासावेत.