X

यशस्वी पालकत्वासाठी काही सूचना.

६) शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर छोट्या छोट्या जबाबदार्‍या देण्यास सुरुवात करणे. बाजारहाट करणे, वह्या पुस्तकांची निगा राखणे, शालेय साहित्य सर्व एका ठिकाणी ठेवणे, गृहपाठ नियमित करणे या गोष्टींची त्यास सवय लावावी.

७) सुट्टीमध्ये मुलाला सहलीसाठी घेऊन जा. नातेवाईकांच्या घरी घेऊन जा. त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटू द्या. स्पर्धेत भाग घेण्याची सवय लावावी.

८) स्वत:ची कामे स्वत: करण्याची त्यांना सवय लावावी. शाळेतील मुलांना त्यांचे पालक जेवण भरवताना दिसतात, अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात.

९) चुकीला क्षमा करणे : एखादी चूक झाल्यास शिक्षा करणे हा त्यावरील उपाय नाही. त्याला समजून घेणे व पुढील मार्गदर्शन करणे. अपयश आल्यास धीर देणे व त्यातून मार्ग काढणे.

१०) मुलांचे कौतुक करणे : आपल्या बालपणाची तुलना मुलाच्या बालपणाशी करू नये. काळ बदलला आहे. थोडे आपणास बदलावे लागले, तर थोडेफार बदल मुलांमध्ये होतील. अभ्यासातील यशाबोरबरच कला, खेळ या क्षेत्रातील यशाचेदेखील कौतुक करावे. चारचौघात मुलांचा अपमान करण्याचे टाळावे.

📍 या काही सूचना येथे दिल्या आहेत. आपल्या कौटुंबिक वातावरणाप्रमाणे यात थोडाफार बदल करावा. पालकत्व म्हणजे त्याग – आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी त्याग केला होता, म्हणून आपण आयुष्यात यशस्वी झालो. या त्यागाची परतफेड आपण करू शकलो नाही. कारण, आज आई वडील हयात नाहीत. आपल्या पाल्याचे जीवन यशस्वी करून या ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पाल्याच्या यशात देवाचा आशीर्वाद आहे, देवाचे आभार मानण्यास विसरू नका. आपणास यशस्वी पालकत्वासाठी शुभेच्छा!