X

बघूया नेमके काय बदल करण्यात आले आहेत.

  • कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरु केलेले होम सेंटर म्हणजेच शाळा तेथे केंद्र ही पद्धत बंद करण्यात आलेली आहे.
  • कोरोनामध्ये कमी केलेला २५% अभ्यास पूर्ववत करून तो १००% केलेला आहे.
  • विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिलेला अर्धा तास जास्तीचा वेळ कमी करण्यात आला आहे.
  • परीक्षा सुरु झाल्यानंतर बैठे पथक पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर बसून राहणार आहे .
  • याबरोबरच विद्यार्थ्यांना बोर्डाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करायचे आहे अन्यथात्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाऊ शकते आणि त्यांच्या परीक्षेवर बंदी घातली जाऊ शकते.
  • असे आहेत बोर्डाने घालून दिलेले नियम ज्यांचं विद्यार्थ्यांना पालन करायचं आहे
  • बोर्डाच्या अधिकृत उत्तरपत्रिका , पुरवण्या ,आलेख ,नकाशे , लॉग टेबल या गोष्टी अनधिकृतपणे मिळवून त्यांचा गैरवापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
  • प्रश्नपत्रिकांची चोरी करणे विकणे आणि विकत घेतल्यास आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर प्रसारित केल्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध घालण्यात येणार आहे .शिवाय परीक्षार्थ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .
  • बोर्डाने अमान्य केलेल्या वस्तू, साहित्य परीक्षा दालनात स्वतःजवळ बाळगणे आणि वापरल्यासही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि परीक्षेस अपात्र ठरू शकतो.
  • परीक्षा देताना उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,वाईट भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा शिक्षकांना धमक्या देणे, बैठक क्रमांक लिहिणे ,फोन नंबर ,भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे. विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे. असे केल्यास अपात्र ठरणार आहेत.