उच्च पदवीधरांसाठी उत्तम संधी
◼️ बँक ऑफ महाराष्ट्रात विविध पदांसाठी भरती होत असून शैक्षणिक पदवीनुसार ही भरती होणार आहे. आॅफीसर स्केल ( 2,3,4,5,6) च्या विविध पदांसाठी थेट भरती जारी केली आहे.
◼️ पात्र उमेदवार bankofmaharashtra.in वर जाऊन फाॅर्म भरू शकतात.
◼️ १९५ पदांची भरती
◼️ इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स, ट्वेंटी, आयटी, डिजीटल बँकींग, इ विभागात भरती
◼️ जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर इ पदे
◼️ शिक्षणाची अट पदानुसार असेल
पदवी, मास्टर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन इ शैक्षणिक पात्रता आवश्यक
◼️ आॅफलाईन अर्ज करावा लागेल.
पी डी एफ डाऊनलोड करावी लागेल. अर्जाचा नमुना यात उपलब्ध आहे.
◼️ उमेदवाराने महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज शुल्काचा डी डी स्पीड पोस्टाने बँकेकडे पाठवा.
◼️ महाव्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र ,एच आर एम विभाग, मुख्य कार्यालय, लोक मंगल १५०१ शिवाजी नगर, पुणे या पत्त्यावर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
◼️ लेखी परीक्षा आणि मुलाखत असे भरतीचे स्वरूप
◼️ अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२४ आहे.