X

जेनेरिक औषधांची गुणवत्ता

जेनेरिक औषधांची गुणवत्ता

  • जेनेरिक औषधाचे फॉर्म्युला पेटंट केलेला असतो. पण त्यात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे पेटंट होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवलेल्या जेनेरिक औषधांचा दर्जा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. त्यांचा प्रभाव ब्रँडेड औषधांसारखाच असतो.

जेनेरिक औषधे इतकी स्वस्त का?

  • पेटंट ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. हे करताना त्यांना रिसर्च, विकास, मार्केटिंग, जाहिरात आणि ब्रँडिंग यासाठी प्रचंड खर्च येतो. जेनेरिक औषधे बनवण्यासाठी त्यांच्या पेटंटची मुदत संपण्याची वाट पहावी लागते. त्यानंतर त्यांचे फॉर्म्युला आणि क्षार वापरून जेनेरिक औषधे बनवली जातात. ज्यांच्या चाचण्या आधीच झाल्याआहेत, त्यापासून जेनेरिक औषधे थेट तयार केली जातात. यासोबतच जेनेरिक औषधांच्या किमती सरकारच्या मध्यस्थीने ठरवल्या जातात. या औषधांच्या जाहिरातीवर कुठेही खर्च केला जात नाही.

तुम्ही जेनेरिक औषधे कुठे खरेदी करू शकता?

  • तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमधून जेनेरिक औषधांची मागणी करू शकता. हेल्थकार्ट प्लस आणि फार्मा जन समाधान वेबसाइट्सवर तुम्हाला जेनेरिक औषधे खरेदी करता येतील. यासोबतच जेनेरिक औषधांची अधिकृत वेबसाइट genericwala.com या दुसऱ्या वेबसाइटवरही तुम्हाला औषधे घेता येतील.