जीवन……

जीवन……

कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते, आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते, कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे, कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही,
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरिचा उच्चार फार गरजेच आहे!

पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते तर मनाला लागलेली ठेचं माणसं बघून जोडायला शिकवते,

जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे, जिंकलो तर आपली माणस मागे राहतात आणि हरलो तर आपली माणस सोडून जातात, स्वतःच्या जीवनाच कोड दुसऱ्याच्या हातुन चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वत: सोडवल तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील, सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही तेव्हढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात विचारात असायला हवी!

स्मार्ट फोन स्लो झाला की तुम्ही काय करता नको त्या फाईल डिलीट करता ना, आयुष्याला मरगळ येते तेंव्हाही असेच करा नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डीलीट करा, आयुष्य पुन्हा वेग घेईल!

जबाबदारी घ्यायला हिम्मत लागते, जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडस लागते आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त कारण लागते!

आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची आणि सकारात्मक विचारांची सोबत असू द्या, परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही पण आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक विचाराने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता!

जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहेत, माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण तुमच्या कर्मांची चुकांची आणि चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते, प्रत्येकाचं आयुष्य एका खेळासारखे असते खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं असते,

पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचे नसून श्वासाचे असते, दोन प्रकारची माणसे असतात टेन्शनमध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी, तुम्ही कोण आहात बघा बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार करू नका, प्रवासात उतरायचं स्थळ आल्यावर रिकामी झालेली खिडकी जवळची जागा काय कामाची, आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि वेळात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या नाहीतर त्याची किंमत शून्य असते,

समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय गोड नाही होणार, तसंच मतलबी लोकांना तुम्ही कितीही आपलंसं करून बघा ती कधीच तुमचे नाही होणार, हवेची पण गंमत असते चाकातून गेली की चाक पळत नाही, डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही, पण शरीरातून श्वासोश्वासातून सोडून गेली तर घरात कोणीच ठेवत नाही, एन्जॉय करण्याची एकही संधी गमावू नका एंजिओग्राफी करण्याची पाळी येणार नाही!

जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते तिथे शांत राहणे आणि ज्याला आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे यालाच स्वाभिमान म्हणतात, एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण भंगाराच्या व्यापाऱ्याला हिऱ्याची कुठे पारख असते, खूप वेगळं जग आहे, खोटं वागा मोठं म्हणतील, चांगलं वागा वाईट म्हणतील!

tc
x