कन्या:-फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे. मतभिन्नता दर्शवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ:-दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात. तिखट व तामसी पदार्थ खाल.
वृश्चिक:-कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागिदारीतून लाभ उठवाल.
धनू:-जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.
मकर:-सहकार्यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.
कुंभ:-नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते.बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल. बाग कामात मन रमेल. अनावश्यक खर्च टाळावा.
मीन:-इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर