May 24, 2025

‘कोड’ बाबतचे समज व गैरसमज

‘कोड’ बाबतचे समज व गैरसमज

१. कोड संसर्गजन्य आहे का?

कोड हा आजार नाही तसेच संसर्गजन्यही नाही. संपर्काने, एकत्र राहिल्याने, जेवल्याने हा आजार पसरत नाही. कोड हा अ‍ॅटोइम्युन आजार आहे.

२. शरीरावरील प्रत्येक पांढरा डाग म्हणजे कोड?

शरीरावर विविध कारणांमुळे पांढरे डाग निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकवेळेस तो कोड असेलच असे नाही. काही वेळेस कुष्ठरोग, भाजल्याच्या जखमेनंतरही त्वचेवर पांढरे डाग पडतात.

३. विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने कोड होतो का ?

मासे खाल्ल्यानंतर जल प्यायल्याने, आंबट किंवा पांढरे पदार्थ खाल्ल्याने कोड होतो असा समाजात गैरसमज आहे. मात्र कोणताही पदार्थ खाल्ल्याने कोड होत नाही.
कोड हा काही आजार नसून शरीरात रंगकणांची कमतरता आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे