काय आहे योजना?
महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानं ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, या वर्षीपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ट्युशन आणि परीक्षा फीमध्ये शंभर टक्के सवलत जाहीर केली आहे. यामुळं सहाजिकच संपूर्ण फी माफ असणार आहे. पण यासाठी पालकांचं उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास विद्यार्थींनी पूर्ण फी भरावी लागणार आहे.
योजनेचा हेतू काय?
विद्यार्थीनींनी फी माफी करण्यामागं मुलींची व्यावसायिक शिक्षणातील संख्या वाढावी तसंच त्यांना शिक्षण घेण्यात मुलांसारखीच संधी मिळावी. महिला सशक्तीकरणासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळं मुलींना केवळ आर्थिक पाठबळ नसल्यानं व्यावसायिक शिक्षणाच्या संधींपासून मुकावं लागू नये, हा यामागचा हेतू आहे.
कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा..