X

एबीपी न्यूज सी व्होटरचा एक्झिट पोल

एबीपी न्यूज सी व्होटरचा एक्झिट पोल
एबीपी न्यूज सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला देशभरातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 353-383 जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. तर इंडिया आघाडीला 152-182 जागा दाखवण्यात आल्या होत्या.

जन की बात एक्झिट पोल जन की बात एक्झिट पोलमध्ये
एनडीएला 362-392 जागा मिळतील, तर भारतीय आघाडीला 141-161 जागा मिळण्याचा दावा करण्यात आला होता.

रिपब्लिक भारत मॅट्रीसचा एक्झिट पोल
रिपब्लिक भारत मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353-368 जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. या एक्झिट पोलने इंडिया अलायन्सला 118-133 जागा आणि इतरांना 43-48 जागा दिल्या होत्या.
रिपब्लिक टीव्ही पी मार्क
रिपब्लिक टीव्ही पी मार्कच्या पोलनुसार, एनडीएला देशभरात 359 जागा मिळतील, तर इंडिया आघाडी 154 आणि इतरांना 30 जागा देण्यात आल्या होत्या.

इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स इंडिया न्यूज डी डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार त्यांनी लोकसभेच्या 371 जागा एनडीएकडे जातील असे म्हटले होते. तर, इंडिया अलायन्स 125 जागांवर राहिल, असा दावा केला होता.

इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडिया
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 361-401 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 131-166 जागा आणि इतरांना 8-20 जागा मिळाल्याचे दाखवण्यात आले होते.