आर्थिक विवरणपत्र कुणी भरायचं?

आर्थिक विवरणपत्र कुणी भरायचं?
● तुमचं एका आर्थिक वर्षातील उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला विवरपणपत्र भरणं अनिवार्य आहे.
● शिवाय तुम्ही भारताचे नागरिक असाल. पण, परदेशात तुमची काही मालमत्ता असेल. किंवा परदेशातील मालमत्तेतून तुम्हाला काही मिळकत मिळत असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं.
● भारताबाहेर एखादं आर्थिक खातं तुम्ही सांभाळत असाल तरी तुम्हाला विवरणपत्र दाखल करावं लागतं. परदेशातली एखादा म्युच्युअल फंड, शेअर, बाँड यांच्यात तुमची गुंतवणूक असेल आणि तुम्ही पगारदार किंवा कमावणाऱ्या नसाल तरीही तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं.
● तुम्ही एका वर्षात एक लाख रुपयांपर्यंतचं वीज बिल भरलं असेल किंवा परदेश वारीवर दोन लाख रुपये खर्च केले असतील तर तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. तुमच्या सर्व खात्यात मिळून ५०,००,००० लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरावं लागतं.
● इनकम टॅक्स रिटर्न अर्थात आर्थिक विवरणपत्राचे चार प्रकार आहेत. आयटीआर १ ते आयटीआर ४ असे चार वेगळे फॉर्म असतात.

आयटीआर १ – पगारदार, एका घरातून उत्पन्न असलेले व इतर स्त्रोत

आयटीआर २ – वैयक्तिक करदाते व एचयुएफ, ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न नाही

आयटीआर ३ – वैयक्तिक करदाते व एचयुएफ ज्यांना उद्योगधंद्यातून प्राप्ती होते

आयटीआर ४ – अनिश्चित मिळकत असलेले व्यावसायिक व उद्योजक

विवरणपत्राबरोबर कुठलंही कागदपत्र जोडावं लागत नाही. पण, पगारदार असाल तर तुमचा फॉर्म १६, पॅन व आधार कार्ड, टीडीएस कापला गेला असेल तर त्याच्या नोंदी, बँक खात्यातील नोंदी व नवीन शेअर खरेदी किंवा इतर कुठलाही व्यवहार असेल तर तशी नोंद असलेलं कागदपत्र या गोष्टी लागतात.

tc
x