आधार आणि रेशनकार्ड लिंक करणे का आहे आवश्यक?
सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे.
याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे.
याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत.
यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते.
असे, सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
यापूर्वीही अनेकवेळा देण्यात आलीय मुदतवाढ
आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
महत्वाचे म्हणजे, रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदत वाढ दिली आहे. आता पुन्हा एकदा हिला मुदतवाढ देत ३० सप्टेंबर २०२४ करण्यात आली आहे. आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर, गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल. ते सुरळितपणे पोहोचू शकेल.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा