अशी होते मैदानी चाचणी
● पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातात.
● या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे.
● मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील.
● १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत.
● मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..