अर्ज केल्यानंतर पुढे काय होतं?
▪️एकदा का तुम्ही ऑनलाईन अर्ज सबमिट केला की तो जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो.
▪️त्यांनी मंजुरी दिल्यानंतर कृषी उप-संचालक यांच्या टेबलावर तो अर्ज जातो. त्यांनीही मंजुरी दिली की तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जातो.
▪️जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मंजुरीनंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळते.
▪️साधारपणे एका महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणं अपेक्षित असतं.
परवाना कधी रद्द होतो?
▪️एक, कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचं दर 5 वर्षांनी नूतनीतकरण करणं गरजेचं असतं. तसं न केल्यास तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.
▪️दुसरं म्हणजे, तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीररित्या खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करत असल्याचं स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आलं आणि त्यासाठी तुम्हाला जिल्हा कृषी अधीक्षकांनी दोषी ठरवलं, तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.
कृषी सेवा केंद्रातून किती नफा राहतो?
कृषी सेवा केंद्राचा विचार केल्यास,
- कीटकनाशक विक्रीतून 7 ते 13 %
- बियाण्यांच्या विक्रीतून 10 ते 11 %
- खतांच्या विक्रीतून 3 ते 7 %एवढा नफा कमावता येऊ शकतो, असं कृषी सेवा केंद्र चालकांच्या बोलण्यातून समोर येतं.
- यामध्ये उधारीवर किती प्रणामात माल दिला जातो, हाही फॅक्टर महत्त्वाचं असल्याचं कृषी सेवा केंद्र चालक सांगतात.