RTE EducationRTE Education

RTE Education : 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे

पुणे : शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत बदल केले आहेत. . शिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू केलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशासाठी उपलब्ध जागांपैकी 10 टक्के जागांचीही नोंदणी झालेली नाही.

नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना प्रवेश दिला जातो. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांमधील २५ टक्के जागा आरटीईसाठी राखीव होत्या.

मात्र, यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करून विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक ते तीन किलोमीटरच्या परिसरात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांचा पर्याय उपलब्ध नसल्यास खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. स्थानिक संघटनांनी या बदलाला विरोध केला आहे.
>>> येथे क्लिक करा <<<<

tc
x