1) अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
2) अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
3) अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
4) अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याचीदेखभाल करण्यास सक्षम असला पाहिजे.
5) रिक्त स्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असायला हवा.
6) राशन दुकान आवारात 15 फुटांचा रस्ता आणि मध्यभागी नागरिक प्रवेश करू शकायला हवे.
7) प्रस्तावित आवारात 5 मीटर लांबीचा आणि 3 मीटर रुंदी आणि 3 मीटर उंचीवर असणे अनिवार्य आहे.
Reshan Shop आवश्यकतेनुसार कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र
3) गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल
4) ग्राम सभेचा ठराव दुकान मागणी पत्र
5) गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र
6) गुन्हा दाखल नसल्या बाबत शपथपत्र
7) वरील कागद पत्रांमध्ये तुमच्या जिल्हा नुसार बदल असू शकतात.
अर्ज कसा करावा
तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्या. तिथे नवीन राशन दुकान परवाना चा अर्ज घ्या. जर तुम्हाला राशन दुकान परवाना अर्ज ऑनलाइन पद्धतीने मिळवायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर भेट देऊन तो अर्ज डाउनलोड करा. सदर अर्ज बिनचूक भरा, आणि त्यासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा. अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा.
>>>> तुळशी विवाह: एक पवित्र प्रथा ,तुळशी विवाहाचे महत्त्व
>>>> मतदान नक्की कराच.