Reshan card : 1 ऑक्टोबरपासून रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का: काय आहे कारण?

Reshan card : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत, ३० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये धान्य मिळणार नाही. एवढेच नाही तर 31 ऑक्टोबर पर्यंत जे लोक ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.

Reshan card : ई-केवायसी केली नाही तर काय होणार?

  • ई-केवायसी केली नाही तर, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत.
  • अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
  • जे लोक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशन दिले जाणार नाही.
  • त्यांचे नाव रेशन कार्ड च्या यादी मधून वगळले जाणार आहे. म्हणजेच अन्नसुरक्षा योजनेतून अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड वगळले जाणार आहे.
  • अन्नसुरक्षा योजनेत जर नाव नसेल तर रेशन कार्ड धारकांना सध्या जे मोफत अन्नधान्य मिळत आहे ते मिळणार नाही.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन मिळविण्यासाठी पात्र कुटुंबांसाठी, पीओएस मशीनद्वारे शिधापत्रिकेत नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ई-केवायसी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश निर्गमित केल्यानंतर केंद्र सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

रेशन कार्ड ई-केवायसीसाठी, तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे आणि केवायसी करूण घ्यावी.

हेही वाचा : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज!!
हेही वाचा : मोठी बातमी ग्रामपंचायतीला बाय-बाय क्लिक करा आणि कागदपत्रे मिळवा.

tc
x