एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड म्हणजे काय?
एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड ही एक योजना आहे जी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक तसेच अंध अपंग असलेल्या प्रवाशांना आपल्या खिशाला परवडेल अशा कमी दरात बसने ये जा करता यावी यासाठी सुरू करण्यात आली आहे.
स्मार्ट कार्ड ही सेवा एमएसआरटीसी, फिनो पेमेंट बैंक, ट्रायमॅक्स आय.टी.इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड लिमिटेड, सिटीकैश, एसटीएस इत्यादि कंपन्या एकत्रितपणे राबवत आहेत.
ज्या नागरीकांकडे हे एम एस आरटीसी स्मार्ट कार्ड असणार त्यांना मोफत तसेच कमी दरात एसटी बसने प्रवास करण्याचा लाभ घेता येणार आहे.
हे पण वाचा :-
एसटी बस चा मोफत प्रवास ‘ या ‘ नागरिकांना मिळणार
कोणाकोणाला मिळणार प्रवासी भाड्यात सवलत
• दिव्यांग बांधव
• प्रज्ञाचक्षू
• जेष्ठ नागरिक
• विविध राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त नागरिक
• शालेय विद्यार्थी
• अशाच प्रकारचे 29 समाज घटक.
स्मार्ट कार्डचा वापर यासाठी करु शकतो,
• बसपास आणि टिकिटाची खरेदी (ईटीआईएम मशीनद्वारे एमएसआरटीसी बसमधे वापरासाटी)
• भागीदार व्यापारी किवा महाराष्ट्रतिल किराणा स्टोर येथे पेमेंट मोड़ म्हणून स्विकरले जाते किवा भविष्यात केले जाईल.
स्मार्ट कार्ड कार्य प्रणालीचे नियमन कराण्यासाठीचे नियम खालीलप्रमाणे आहेत:-
कार्ड ,पास आणि सवलतिशी संभदित सामान्य आणि शर्ती खालील वेबसाईट लिंक वर मिळतील https://msrtc.maharashtra.gov.in/
एसटी बस वॉलेटशी संभदित अटी व शर्ती खालील वेबसाईट लिंक वर मिळतील http://www.citycash.in/terms.html
शॉपिंग वॉलेटशी संभदित अटी व शर्ती खालील वेबसाईट लिंक वर मिळतील https://www.finobank.com/terms-and-conditions/