Remember : आत्ताच तुझी आठवण आली!

आत्ताच तुझी आठवण आली!

हे कुणालाही, कधीही, कुणाकडूनही ऐकायला आवडतील असे शब्द…..

आपण कुणाच्या तरी आठवणीत आहोत, हे मनाला सुखावणारं….
आपला एखादा शब्द, एखादी कला, एखादा गुण किंवा केलेली कृती कुणाच्या तरी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसते आणि कधी क्षणाची संधी मिळाली, की जमिनीतून झरा फुटावा तशी नेणीवेतून जाणिवेत येते…..

कधी सहजच काही आठवतं कुणाबद्दल,…
अगदी छोटासाही संदर्भ पुरतो त्यासाठी…
फार काही विशेष नसलं, तरी दोन क्षण पुन्हा इतिहासात जातोच आपण,

आणि जेव्हा अशी एखादी आठवण, जी, खूप प्रयत्नांनी आपण अंतर्मनात ढकललेली असते….
केव्हातरी मनातल्या कुपीतून बाहेर पडतेच…

आणि तेव्हा……
तेव्हा मग मनात श्रावण फुलतो…
सगळं मन हळदीचं होऊन जातं…
चेहऱ्यावरचे भाव चटकन बदलतात…..
कुणाशी तरी हितगूज करावंसं वाटतं….

पण नक्की काय ते कळत नाही….
मग आपणच बोलत राहतो आपल्या आठवणींशी………
बऱ्याच वेळा स्वतःशीच…
शक्य झालं तर कधी दुसऱ्याशी….
स्वतःशीच हसतो…
डोळे चमकतात….
नकळत आपला मुखवटा गळून पडतो,
चेहऱ्याची इस्त्री विस्कटते….
स्वतःचीच नव्याने ओळख होते….
छान मोकळं वाटायला लागतं…
पण अगदी क्षणभरच……….

आणि हा अनुभव फार छान असतो…
क्षणभर आपण आपले सगळे त्रास… सगळ्या dead lines विसरतो…
ढगाळलेलं आभाळ क्षणात स्वच्छ होतं…..
अंगात अठरा हत्तींचं बळ संचारतं…..
काहीच अशक्य नाही असं वाटायला लागतं…..
आणखी असंच काय काय होतं…

अनुभवलंय कधी?

म्हणून म्हटलंय…
आठवण स्वतःच एक साठवण असते…
ती आपली कुणी काढू दे…
किंवा आपल्याला कुणाची येऊ दे…..
क्षणात आपल्याला क्षणभरासाठी का होईना…
बदलवून टाकते…
एवढं मात्र खरं.

म्हणून आजपासून एकच करूया….
कधी कुणाची आठवण आलीच, तर तडक त्या व्यक्तीला सांगून टाकूया….

“आज तुझी आठवण आली!” 💞

पाहा मन किती हलकं होईल, प्रसन्न वाटेल…!

तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा

tc
x