WhatsApp Image 2023 06 20 at 3.30.26 AM

एका प्रकरणात उच्च न्यायालयाने विवाहित महिलेला पतीच्या ऐवजी तिच्या प्रियकरसोबत राहण्याची परवानगी दिली. एक विवाहित स्त्री तिच्या प्रियकरासोबत स्वतःच्या इच्छेने राहते त्यामुळेच तिला तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असून याप्रकरणी विवाहितेच्या पतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने सांगितले होते की, आमचे दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले आणि त्यानंतर आम्हाला दोन मुले झाली. आम्हा दोघांना दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. ऑगस्ट 2022 मध्ये माझी पत्नी माहेरी गेली. यानंतर मला वाटले की ती तिच्या मैत्रिणीसोबत राहत आहे. जे प्रकरणातील प्रतिवादी क्रमांक 9 आहे. पतीने तक्रारीत म्हटले आहे की, तीच्या मित्राने माझ्या पत्नीला बेकायदेशीरपणे त्यांच्या घरी ठेवले आहे याविषयी त्याने रिट याचिका दाखल केली होती आणि बायकोचा ताबा मिळावा अशी मागणीही केली होती.

न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान त्या व्यक्तीच्या पत्नीला न्यायालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार याचिकाकर्त्याची पत्नी न्यायालयात हजर राहिली. तिने न्यायालयात सांगितले की तिचा पती आणि या खटल्यातील मुख्य याचिकाकर्ता तिच्याशी चांगलं वागत नाही,गैरवर्तन करतो, म्हणूनच मला त्याच्या घरात राहायचे नाही आणि मी माझ्या इच्छेनुसार माझ्या मित्रासोबत राहतो. केवळ किंवा महिलेच्या पतीचे आरोप घातक आहेत. मात्र पतीने हे आररोप फेटाळले. लाइव्ह लॉने याविषयी वृत्त दिले आहे.

न्यायमूर्ती मनोज कुमार तिवारी आणि न्यायमूर्ती पंकज पुरोहित या दोघांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकल्या. त्यानी या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्त्याने म्हणजे महिलेच्या पतीला दिलासा दिला नाही. या प्रकरणात, न्यायालयाने म्हटले आहे की प्रतिवादी क्रमांक 9 म्हणजे त्या महिलेचा मित्र तिच्या स्वेच्छेने राहत आहे. म्हणूनच तिला तशीच राहण्याची संमती दिली आहे हे सांगत महिलेच्या पतीने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.

tc
x