सोने, चांदी, हिरे, मोती अशा विविध प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. विशेषतः स्त्रिया आणि विवाहित महिला सोन्या-चांदीचे-दागिने जास्त घालतात. पण कंबरेच्या वर घातले जातात. यामागचे धार्मिक व शास्त्रिय कारण जाणून घेऊ.
कमरेखाली सोने का घालू नये याची धार्मिक कारण
- पायात पैजण किंवा इतर चांदीचे दागिने घातले जातात. मात्र, कधीही सोन्याच्या धातूचे अलंकार पायात परिधान करू नयेत. याविषयी एक धार्मिक मान्यता आहे की, भगवान श्री हरी विष्णू यांना सोन्याची खूप आवड असल्याने सोने नाभी किंवा कमरेच्या खाली घालू नये.
- पायात सोनं घातलं तर भगवान विष्णूंचा कोप होतो. भगवान विष्णूंप्रमाणेच माता लक्ष्मीलाही सोने आवडते. पायात सोने धारण करणाऱ्या व्यक्तीला देवी लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहावे लागते आणि त्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे मानले जाते.
- सोन्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते अशी धार्मिक मान्यता आहे. सोन्याचे पैजंण किंवा पांगळे धारण केल्याने देवी लक्ष्मीचा अनादर होतो. असे केल्याने धनहानी सहन करावी लागते असे ही म्हटले जाते.
वैज्ञानिक शास्त्रानुसार पायात सोने का घालू नये - शरीराच्या वरच्या भागाला उबदारपणा आणि खालच्या भागाला फक्त थंडपणाची गरज असते.
- शरीराच्या सर्व अवयवांमध्ये सोन्याचे दागिने घातल्यास शरीराचे तापमान वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात..
- सोन्याच्या दागिन्यांमुळे शरीरातील उष्णता वाढते. अशा स्थितीत पायात सोन्याचे दागिने घातल्यास ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते, त्यामुळे पायात चांदीचे दागिने घालावेत, जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहते.
- दागदागिने घातल्याने उर्जा डोक्यापासून पायपर्यंत आणि पायांपासून डोकेपर्यंत प्रवाहित होते. दुसरीकडे, जर डोक्यावर आणि पायांवर सोन्याचे दागिने घातले गेले तर शरीरात अशी ऊर्जा प्रवाहित होत नाही. ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो आणि बरेच रोग देखील उद्भवू शकतात.
- चांदीचे दागिने घालण्यामुळे पायांच्या हाडांमध्ये वेदना होत नाही. म्हणूनच, ज्या स्त्रिया पायात चांदी घालतात त्यांना सांधेदुखीची समस्या होत नाही. याशिवाय, चांदी हा धातू शरीरात रक्त चांगल्या प्रकारे प्रवाहित करण्यास मदत करते. त्यामुळे पायात चांदीचे दागिने घालावे.
This post was last modified on %s = human-readable time difference 4:45 am