रेशन कार्ड संदर्भात महत्वाचं अपडेट New Update
रेशन कार्ड चे अनेक फायदे आहेत. अनेक वेळा शासकीय कामं करिता आपण रेशन कार्ड वापरतो, तसेच रेशन कार्ड च्या माध्यमातूनच केंद्र शासन तसेच राज्य शासन देशातील लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्याचे वाटप करीत आहे. .
आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक वेळा शेतकरी बांधवांकडून तसेच इतर नागरिकांकडून विचारणा करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे तसेच जे शेतकरी सदन आहेत, अशा शेतकऱ्यांचा रेशन कार्ड बंद करण्यात आलेला आहे का? तसेच राज्यातील सरकारी, नोकरदार तसेच निमशासकीय नोकरीवर असणारे व खाजगी नोकरदार यांचे Ration Card बंद करण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे रेशन कार्ड संदर्भात असलेले Ration Card New Update तुमच्याकरिता महत्त्वाचे असणार आहे.
हे ही वाचा : – PM केंद्र सरकारकडून रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी
रेशन कार्ड बंद करण्या संदर्भात नवीन अपडेट:
आपल्या महाराष्ट्र राज्यात दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेशन कार्ड धारकांकरिता एक महत्त्वाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जे शेतकरी सदन आहेत, तरी सुद्धा रेशन कार्ड च्या माध्यमातून मोफत अन्नधान्य मिळतात परंतु त्यांना या अन्नधान्याची त्यांना गरज नाही, अशा लाभार्थ्यांना स्व इच्छेने त्यांना मिळणारे अन्नधान्य सोडण्याकरिता अर्ज करता येणार आहे.
या लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार बंद:
- ज्या लाभार्थ्यांनी त्यांची आधार सीडींग केलेले नाही, अशा लाभार्थ्यांना रेशन कार्ड मधून वगळण्यात येणार आहे.
- काही लाभार्थी मयत झालेले आहेत, काही लाभार्थी नोकरी निमित्त किंवा व्यवसाय निमित्त दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, अशांची रेशन कार्ड रद्द होणार आहे.
- बोगस रेशन कार्ड लाभार्थी यांची सुद्धा रेशन कार्ड बंद होणार आहे.
- पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेले परंतु सधन असणारे शेतकरी.
- शासकीय नोकरीवर असून सुद्धा रेशन कार्डच्या योजनांचा लाभ मिळवणारे लाभार्थी
- ज्यांचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत, अशांची ओळख पटवून त्यांची रेशन कार्ड बंद होणार आहे.
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपये पेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे.
- मोठ्या प्रमाणात आयकर असणारे व्यापारी
- आयकर भरणारे लाभार्थी
- घरी लाभार्थ्यांना डायरेक्टली या योजनेअंतर्गत रद्द करण्यात येणार नसून किंवा त्यांचे Ration Card बंद करण्यात येणार नसून त्यांच्याकरिता या विशेष मोहिमेअंतर्गत स्व इच्छेने रेशन कार्डच्या योजनांचा लाभ बंद करता येणार आहे.
हे ही वाचा :- रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करायचे