सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. तेथील एजंटांकडून अधिकचे पैसे मोजून कागदपत्रे देऊन अर्ज करावा लागतो; मात्र त्यानंतरही रेशनकार्ड मिळेलच याची खात्रीही नसते; मात्र आता एजंट व सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक लूट थांबून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशनकार्ड मिळू शकणार आहे. याबाबतचा निर्णय महसूल सप्ताहानिमित्ताने १ ऑगस्टपासून घेण्यात आला आहे.
कागदपत्रांची करा ऑनलाईन पूर्तता
ऑनलाइन ई-शिधापत्रिका मिळण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड तपशील.
- उत्पन्नाचा तपशील,
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र,
- लहान मुलांचा जन्माचा दाखला इत्यादी आवश्यक माहिती
- व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने ई-शिधापत्रिका प्रणालीवर अपलोड करून पूर्तता करावी.
या सुविधांचा होईल लाभ
अर्जदाराला आता घरबसल्या ई- शिधापत्रिका डाऊनलोड करता येणार आहे. ई-शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेव्यतरिक्त अन्य सुविधांचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे शिधापत्रिकेत नवीन
नाव अँड करता येणार
हे ही वाचा : – एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा भडकणार, 11 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन, सरकारच्या अडचणी वाढणार
नागरिकांची लूट थांबणार
मालेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत दुयम ई-शिधापत्रिका १४ व नवीन ई- शिधापत्रिका १ इतक्या वितरित करण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांना आता ई-शिधापत्रिका मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा. त्यामुळे एजंटांकडून होणारी आर्थिक लूट थांबून नागरिकांना निःशुल्क ई-शिधापत्रिकेचा लाभ मिळणार आहे.
हे ही वाचा : – मोफत राशन देत नाही? मग ‘या’ नंबरवर करा कॉल
ऑनलाइन अर्ज कुठे कराल?
अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून घेता येईल. यासाठी http://rcmc.mahafood. gov.in या वेबसाइटवरूनही ई- शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.
शिधापत्रिका वितरणाच्या कामकाजात सुलभता येण्यासाठी व एजंटांकडून नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी तसेच नागरिकांना कमी कालावधीत शिधापित्रका मिळावी, यासाठी ई-शिधापत्रिका प्रणालीचा सुरु केली आहे. याद्वारे नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळू शकणार आहे.