मोफत रेशन मिळणाऱ्या कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत अनेक राज्यांना तांदूळ व गहू विक्री करणं काही काळापूर्वी बंद केलं होतं.
सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम गरीबांना मोफत धान्य देणाऱ्या राज्यांवर झाला. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यांना केंद्रीय पूलमधून गहू आणि तांदूळ मिळणं बंद झालं होतं.
आता ई-लिलावाच्या पहिल्या फेरीत छोट्या व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद न मिळाल्याने योजनेत बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. तांदूळ विक्रीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या ई-लिलावाला थंड प्रतिसाद मिळाला आहे.