Ratan Tata : रतन टाटांची जीवनमूल्य…त्यांची १० अजरामर विधानं!
१. लोखंडाला त्याचा स्वत:चा गंज वगळता दुसरं कुणीही उद्ध्वस्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुणाही व्यक्तीला त्याची स्वत:ची मानसिकताच उद्ध्वस्त करू शकते, इतर कुणीही नाही!
२. लोकांनी तुमच्या दिशेनं भिरकावलेले दगड घ्या आणि त्यातून भव्य स्मारकांची निर्मिती करा!
३. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आयुष्यातले चढ-उतार फार महत्त्वाचे असतात. कारण सरळ रेषा, मग ती ईसीजीमधली का असेना, तुम्ही जिवंत नसल्याचं दर्शवते!
४. जर तुम्हाला वेगाने चालायचं असेल, तर एकटे चाला. पण जर तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल, तर सोबत चाला!
५. नेतृत्व म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणं नव्हे, नेतृत्व म्हणजे तुमच्या अधिकारात असणाऱ्यांची काळजी घेणं!
६. सहानुभूती आणि दयाळूपणा ही एखाद्या नेतृत्वाची सर्वोच्च ताकद असते!
७. यश हे तुम्ही कोणत्या पदावर आहात यावरून ठरत नसतं, तर इतरांवर तुमच्या असणाऱ्या प्रभावावरून ठरत असतं!
८. माझा गोष्टी नशीबावर सोडून देण्यावर विश्वास नाही. माझा कठोर मेहनत आणि तयारीवर विश्वास आहे!
९. माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाही. मी आधी निर्णय घेतो आणि मग ते योग्य ठरण्यासाठी प्रयत्न करतो!
१०. ज्या दिवशी मी स्वत:हून काही करू शकणार नाही, त्या दिवशी मी माझं सामान आवरेन आणि निघून जाईन!
Ratan Tata : रतन टाटा यांच्या या गाजलेल्या विधानांचा अंदाज घेतल्यास त्यांचं आयुष्यच त्यातून प्रतिबिंबित होत असल्याचं दिसून येतं. ते स्वत: देखील याच तत्त्वांवर आयुष्य जगले आणि त्यांनी इतरांनाही हीच तत्व अंगीकारण्याचा सल्ला दिला!
“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला , ती आठवण सांगाल का”?
रतनजी टाटा म्हणाले: “मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.”
पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.
त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.
चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.
पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”
मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.
मुलाने म्हटले:- “मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण इतरांना होईल असं काही चांगले काम आपण केलं आहे का?
कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.
भारताचा कोहिनूर हिरा
माणसातील देव माणूस रतन जी टाटा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली
हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी
हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?
हेही वाचा : बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या: नोंदणी कशी करावी?