Raksha Bandhan: जाणून घ्या…रक्षाबंधनाची सुरूवात नेमकी कशी झाली? रक्षाबंधन: जाणून घ्या शुभ मुहूर्त व भावासाठी मंत्र

💫 रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम दर्शवतं. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. याला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात, तर भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. हा हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. पण रक्षाबंधनाच्या सणाची सुरुवात कशी झाली, हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे एक पौराणिक कथा आहे. चला तर मग रक्षाबंधन साजरे करण्यामागील पौराणिक कथा जाणून घेऊया.

रक्षाबंधन: जाणून घ्या शुभ मुहूर्त व भावासाठी मंत्र

हे ही वाचा :
रक्षाबंधन: ३० की ३१ ऑगस्टला? जाणून घ्या शुभ मुहूर्त व भावासाठी मंत्र

✨ श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे, त्यानसार असं मानलं जात की, रक्षाबंधन या सणाची सुरुवात साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची मानस भगिनी द्रौपदी यांच्यापासून झाली आहे. रक्षाबंधनाशी संबंधित एक महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते. एकदा शिशुपालाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे बाेट सुदर्शन चक्राला लागून कापले असता, त्यातून रक्तस्त्राव हाेऊ लागला. द्रौपदीने लगेच आपल्या साडीच्या पदराचा काठ फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. यामुळे रक्तस्राव थांबला.

💁🏻‍♂️ कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले, असे सांगितले जाते. याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधन साजरे करावे, असा सल्ला दिला होता.

हे ही वाचा : लहान मुलांनी आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे ठरते उपयुक्त

tc
x