देशातील अनेक राज्यांवर अजूनही पावसाचे संकट घोंगावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसासह गारपीट सुरु आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
WETHAER UPDATE: देशातील अनेक राज्यांमधील वातावरणात बदल झाला आहे. काही राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे तर काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे
देशात सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. पण काही भागात वातावरण बदलामुळे जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान
भारतीय हवामान खात्याकडून आणखी दोन दिवस गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रातीकाही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य प्रदेशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्ततवण्यात आली आहे. त्याच वेळी, 09 आणि 10 मार्च रोजी ओडिशा, बंगाल आणि झारखंडच्या काही भागात पावसाचे क्रियाकलाप पाहिले जाऊ शकतात. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशसमवेत अनेक राज्यांत पावसामुळे तापमानात घट झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य प्रदेश, मराठवाडा आणि गुजरात या राजस्थानच्या वेगवेगळ्या भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्याच वेळी, हवामानशास्त्रीय विभागाच्या मते, मुंबईतील जास्तीत जास्त तापमान 10 मार्च रोजी 36 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
महाराष्ट्रातील अनेक भागात २ दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि गारपीट
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागात जोरदार वारा आणि गडगडाटासह वीजपुरवठा खंडित झाला.
रब्बी पिकांचे मोठे नुकसान
ऐन रब्बी पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव आणि धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.