rain update : शेतकरी पुन्हा संकटात ; मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता, पुढील पाच दिवस महत्त्वाचे .

शेतकऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : कधी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर कधी अवकाळी पावसाचा आवाज, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हवामानाचे स्वरूप सतत बदलत आहे. या बदलाचा परिणाम पिकांवरच नाही तर आरोग्यावरही होत आहे.

आतापर्यंत उन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान केले. तर तेथे काही लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. अपेक्षेनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात शुक्रवारी म्हणजेच २६ एप्रिल आणि २७ एप्रिलला पावसाचा जोर अधिक असेल.

त्यामुळे संपूर्ण पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असून गारपीट होण्याची शक्यता आहे.विदर्भ, मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने राज्याच्या तापमानात काहीशी घसरण झाली आहे.

पुढील पाच दिवस तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होईल. पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच गारपिटीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने असे ट्विट केले आहे.

tc
x