Railway Recruitment 2024 : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे जॉबबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकार तरुणांना रेल्वे नोकरीची संधी देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. तसेच रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरु असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (११ डिसेंबर) लोकसभेत म्हटलं.
अश्विनी वैष्णव म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये रेल्वेत तरुणांना अधिक नोकरीची संधी उपलब्ध करु देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.” असं रेल्वे मंत्री म्हणाले.
मोदी सरकारमध्ये रेल्वे बजेट 2.52 लाख कोटी इतकं आहे. या 10 वर्षांमध्ये 31 हजार किलोमीटर नवे रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच 15 हजार किमी रेल्वे ट्रॅकवर ‘रेल्वे कवच यंत्रणा’ कार्यन्वित करण्यात आली आहे. समृद्ध देशात जी कामं 20 वर्षात झाली आहेत, त्यासाठी भारतात फक्त 5 वर्ष लागली.” अशी माहिती त्यांनी दिली.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..