X

Rahul Gandhi : लग्न करणार पण…..

राहुल गांधीं लग्न करणार पण…..
मला योग्य मुलगी मिळाली की मी लग्न करेन असे राहुल गांधींनी म्हंटल. परंतु मुलगी हुशार आणि बुद्धिमान असावी असेही ते म्हणाले. माझ्या आई-वडिलांचे लग्न अप्रतिम होते आणि त्यामुळे माझेही लग्नाबद्दलचे विचार खूप उच्च आहेत. मलाही स्वतःसाठी असाच जीवनसाथी हवा आहे असं राहुल गांधींनी सांगितलं.

Rahul Gandhi : मी पंतप्रधान झालो तर…..
“पंतप्रधान झालो तर शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवणार. उद्योगांना मदत करणार. तसेच शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसह अडचणीत सापडलेल्या जनतेच्या पाठीशी उभे राहणार,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

Rahul Gandhi :पहिल्या जॉब च काय झालं…..
राहुल गांधींनी लंडनमध्ये मॉनिटर कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी केल्याचं सांगितलं आहे. “तेव्हा मला मी २५ वर्षांचा होतो. तर, पहिला पगार ३ हजार पौंड होता. हे पैसे खोलीच्या भाड्यासाठी जात होते,” असं राहुल गांधी म्हणाले.

This post was last modified on January 24, 2023 4:59 am

Davandi: