Private Vehicle : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला चाचणी देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत.
सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही. त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम १ जून २०२४ पासून लागू होतील.
नवीन नियमांनुसार,
● स्थळानुरूप ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये एवढा दंड असेल.
● अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना पकडली गेल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच वाहनमालकाचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल.
● वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना परवाना मिळू शकणार नाही.