भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंह पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
आज सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
शेखावत यांचा जीवनप्रवास
देवीसिंह शेखावत यांचा ७ जुलै १९६५ रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी ते अमरावतीचे महापौर होते. सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं होतं.
विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
This post was last modified on February 24, 2023 10:59 am