Post office : गुंतवणूक करताना तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना या बँक एफडी योजनांपेक्षा चांगला व्याजदर देतात व परतावा देखील जास्त मिळतो.
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना
▪️पोस्टात ऑफिसच्या अनेक योजनांपैकी पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट ही योजना उत्तम व्याज देणारी योजना म्हणून ओळखली जाते.
▪️विशेष म्हणजे यामध्ये गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु या माध्यमातून हमी परतावा देखील मिळतो.
▪️त्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.5% व्याज दिले जात आहे.
▪️विशेष म्हणजे या योजनेत सर्व गुंतवणूकदारांकरिता व्याजदर हा समान आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना पाच वर्षाच्या कालावधी करिता 7.5% व्याजदर मिळतो तर ज्येष्ठ नागरिकांना देखील तितकाच मिळतो.
Post office : ▪️हे व्याज दरवर्षी दिले जाते. परंतु व्याजाची मोजणी त्रैमासिक होते.
▪️तसेच तुम्ही ही योजना तिच्या मुदतीपूर्वी देखील बंद करू शकतात. परंतु यामध्ये नुकसान असे होते की, तुम्हाला कमी व्याजदर मिळतो किंवा कमी व्याज मिळते.
▪️समजा तुम्ही चार वर्षानंतर पैसे काढले तरी तुम्हाला चार टक्के दराने व्याज मिळते.
▪️पूर्ण पाच वर्षे कालावधी करिता गुंतवणूक केली तरच या योजनेत 7.5% व्याजदर मिळतो.
बँक एफ डी मध्ये किती व्याज मिळते? >>येथे क्लिक करा <<