पोलीस भरती : पोलिस भरतीसाठी एक नवीन नियम आणला आहे. हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. पोलिस भरतीसाठी आता एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले होते. पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पोलीस भरती
पोलीस भरती : का घेतला निर्णय
राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज केले आहेत. परंतु आता त्यांना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी हमीपत्र द्यावे लागणार आहे. उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात.
हेही वाचा : आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा, जागांची आकडेवारी जाहीर… आता किती शाळांमध्ये होणार प्रवेश?
कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास तो सोयीचा जिल्हा निवडतो. परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची अट करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख येथे पहा