Police Recruitment : मोठी बातमी! पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित
पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित; जाणून घ्या काय आहे कारण?
पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया 18 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.
Pune Police Bharti 2023 : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कारण अस आहे की कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया 18 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.
3 जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.
अशातच, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील (Pune News) पोलीस भरती 27 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
पुणे पोलीस (Pune Police) मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया 18 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, असं उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागलेल आहे.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – 720 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: 450 /- रुपये
- मागास प्रवर्ग: 350 /- रुपये
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)
- अधिकृत वेबसाईट – http://punepolice.gov.in/
This post was last modified on %s = human-readable time difference 6:10 am