PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का ? मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात

PhonePe, Paytm, Gpay

🔒 स्क्रीन लॉक वापरणे आवश्यक : जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये UPI ऍप्स वापरत असाल. त्यामुळे फोनवर स्क्रीन लॉक नक्कीच ठेवा. तसेच पिन किंवा फिंगरप्रिंटद्वारे ऍप लॉक करा. तसेच फोन लॉकला असलेला पिन UPI पिन म्हणून ठेवू नका.

🚫 UPI पिन शेअर करू नका : UPI पिन हा कोणत्याही डिजिटल व्यवहाराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. अशा परिस्थितीत हा पिन कुठेही लिहून ठेवणे किंवा सेव्ह करुन ठेवणे धोकादायक ठरू शकते.

हे ही वाचा :- Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

🔄 UPI ऍप अपडेट ठेवा : तुमचे UPI ऍप्स नेहमी अपडेट असले पाहिजेत हे लक्षात ठेवा. कारण, कंपन्या वेळोवेळी ऍपमध्ये नवनवीन फीचर्स जोडतात. याशिवाय, ऍपसाठी अनेक सुरक्षा अद्यतने देखील जारी केली जातात.

💰 पैसे पाठवण्यापूर्वी UPI आयडी तपासा : डिजिटल ऍप्सद्वारे पेमेंट करण्यापूर्वी, प्राप्तकर्त्याचा UPI आयडी तपासणे आवश्यक आहे. तुम्ही नंबर द्वारे करत असाल तरी एंटर केल्यानंतर एकदा नाव तपासा आणि समोरच्याकडून क्रॉसचेक करा.

हे ही वाचा :- देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला.” खरी वास्तवता आहे बरं ही”

tc
x