perfume tips/ advised : परफ्यूम केवळ चांगला सुगंध देत नाही तर यामुळे तुमचा आत्मविश्वास आमि आत्मसन्मान वाढतो. परफ्यूममुळ तुमचा लूक एकमद परिपूर्ण होतो.
Perfume Tips and Advice : आजकाल टेलिव्हिजनवर परफ्यूमच्या एकापेक्षा एक वरचढ जाहिराती पाहायला मिळतात. परयफ्यूमचे २ स्प्रे मारुन घराबाहेर पडताच तरुणी तुम्हाला फॉलो करायला लागतात.
चांगल्या परफ्यूममुळे लोकांसमोर तुमची एक वेगळी छाप पडते. याशिवाय सुगंधीत परफ्यूममुळे आपला मूड फ्रेश होतो. खरोखर जाहिरांतींप्रमाणे घडत नसले तरी लोकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित होते. पण अनेकजण योग्य परफ्यूम कसा निवडावा याबाबत अद्याप संभ्रमात असतात,.
१) सुगंधाबद्दल थोड जाणून घ्या
परफ्यूमचे अनेक प्रकार आहेत. ज्यात काहींना फ्रूट, फ्लॉवर तर काहींना एकदम डार्क, माईल्ड सुगंधाचे परफ्यूम आवडतात. पण तुम्हाला फ्रूट किंवा फ्लॉवर स्मेलचा परफ्यूम आवडत असेल तर वेगवेगळे पर्याय जाणून घ्या, यातून तुम्हाला आरामदायी वाटेल तो सुगंध निवडा. तुम्ही रोज वापरत असलेल्या परफ्यूमची तुलना करा जेणे करून तुम्हाला आवडेल तो परफ्यूम घेण्यास मदत होईल.
२) परफ्यूमच्या नोट्सवर लक्ष द्या.
प्रत्येक परफ्यूमच्या लेबलवर वेगवेगळ्या नोट्स् असतात. काहीं परफ्यूममध्ये फ्लॉवर आणि फ्रूटी बेस तर काहींमध्ये थोडा तिखट सुगंध असू शकतो. आपल्याला अनेकदा फ्लॉवर बेस वाटणाऱ्या परफ्यूमचा सुगंध स्कीनवर अप्लाय केल्यानंतर बदलेला वाटतो.
३) टेस्टर परफ्यूमचा वापर करा
अनेकदा मॉलमध्ये आपल्यासाठी परफ्यूमचे काही टेस्टर ठेवलेले असतात. त्यातील तुम्हाला योग्य वाटेल तो टेस्टर परफ्यूम मनगटावर स्प्रे करुन बघा आणि तो हुंगून पाहा. जर स्ट्रिपवरचा सुगंध ५ ते १० मिनिटांपर्यंत राहिला तर समजून जा की, तो परफ्यूम तुमच्यासाठी योग्य आहे.
४) तुमची त्वचा समजून घ्या.
कोणतेही परफ्यूम किंवा सौंदर्य उत्पादने निवडण्यापूर्वी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली त्वचा ओळखणे. तुमची त्वचा फार संवेदनशील असेल तर स्टाँग फॉर्म्युलेशनचा परफ्यूम घेऊ नका कारण यामुळे डोकेदुखी होऊ शकते. कोणताही परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी त्वचा जाणून घ्या.
परफ्यूम वापरण्याच्या योग्य पद्धती जाणून घ्या थोडक्यात
१) त्वचा मॉइश्चरायझर करा
त्वचा कोरडी असेल तर परफ्यूमचा स्मेल जास्तवेळ राहत नाही. यामुळे परफ्यूम वापरण्यापूर्वी त्वचा मॉइश्चराय करुन घ्या. यामुळे परफ्यूमचा सुगंध अधिक काळ टिकतो, तसेच त्वचेला परफ्यूममुळे होणारी हानी रोखता येते.
२) नाडीच्या बिंदूंवर परफ्यूम स्प्रे करा
शरीराच्या नाडीच्या बिंदूंवर परफ्यूम स्प्रे करा. जसे की, मान, मनगट, खांदा, गुडघाच्या मागची बाजू, कानाच्या पाठी, आतील कोपर, पोटाच्या बेंबीजवळ स्प्रे करा. अतिरिक्त उष्णता उत्सर्जित करतात ज्यामुळे नैसर्गिकरित्या सुगंध पसरतो आणि सुगंध मजबूत होतो.
३) अंघोळीनंतर लगेच परफ्यूम लावा
परफ्यूम दीर्घकाळ टिकण्यासाठी तो बाहेर जाण्यापूर्वी वापरण्याऐवजी अंघोळीनंतर लगेच वापरा. अंघोळीनंतर तुमची त्वचा अधिक उबदार होते ज्यामुळे परफ्यूम चांगल्याप्रकारे शोषून घेते. पण परफ्यूम लावण्यापूर्वी आपली त्वचा आंघोळीनंतर टॉवेलने कोरडी स्वच्छ करुन घेणे
४) केसांवर थोडेसे परफ्यूम वापरू शकता
शरीराव्यतिरिक्त तुम्ही केसांनाही सुगंधीत करु शकता. केसांच्या आजूबाजूला आणि वरती काही नॉन अल्कोहोलवर आधारित परफ्यूम वापरु शकता.
५) कपड्यांवर परफ्यूम लावा
तुमच्या शरीरावरील सुगंध दीर्घकाळ टिकावा यासाठी तुम्ही कपड्यांवरही परफ्यूम लावू शकता.
पण रेशमी कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता असे अशावेळी परफ्यूम हातावर स्प्रे करून तो कपड्यांवर चोळा. कपड्यांवर त्वचेपेक्षा वेगळा सुगंध येऊ शकतो.