X

Peace of mind : मन शांत ठेवण्यासाठी करा ‘ही’ 3 योगासने, तणावापासून व्हाल मुक्त

Peace of mind

Peace of mind : तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर योग करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पुढील योग प्रकार केल्याने मन शांत आणि तणाव कमी होऊ शकतो. जर तुम्ही नियमितपणे सकाळी योग केला तर दिवसभर तंदुरूस्त राहाल.

शवासन
जर तुम्ही शवासन केले तर अनेक आरोग्यदायी होतात. हा योग केल्याने उच्च रक्तदाब आणि तणाव नियंत्रणात राहते. तसेच मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते. तसेच एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवते.

भुजंगासन
मन शांत आणि तणाव कमी करण्यासाठी भुजंगासन करणे फायदेशीर ठरते. हा योगप्रकार नियमितपणे सकाळी करावा. यामुळे शरिरातील स्नायू मजबुत होतात.

कपालभारती
कपालभारती श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. कपालभारती केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत होते. हा योगप्रकार केल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

टीप:

  • योगासने करताना तुमच्या शरीराला त्रास होत असल्यास ताबडतोब थांबवा.
  • योगासने करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या असल्यास.
  • योगासने शांत आणि हवेशीर ठिकाणी करा.

नियमित योगासने केल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता आणि तुमचं मानसिक आरोग्य सुधारू शकता.

This post was last modified on %s = human-readable time difference 2:23 pm

Davandi: