X

PCMC Shikshak Recruitment 2024 : शिक्षकांसाठी सुवर्ण संधी! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत जागांसाठी भरती सुरू!

PCMC Shikshak Recruitment 2024

PCMC Shikshak Recruitment 2024 :
आज अनेक जण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळवणं हे उमदेवारांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) ‘सहाय्यक शिक्षक’ (Assistant Teacher) आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 327 पदांसाठी ही भरती होणार आहे.

PCMC Shikshak Recruitment 2024 : दरम्यान, या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. दरम्यान, या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता? अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अर्जाची शेवटची तारीख याच विषयी सविस्तर जाणून घेऊ.

पद आणि पदसंख्या-
मराठी माध्यम –
सहाय्यक शिक्षक – 151 पदे
पदवीधर शिक्षक – 94 जागा
मराठी माध्यम एकूण पदांची संख्या – २४५

हिंदी माध्यम
सहाय्यक शिक्षक – ५ पदे
पदवीधर शिक्षक – ११ पदे
हिंदी माध्यम एकूण पदांची संख्या – १६

उर्दू माध्यम
सहाय्यक शिक्षक – ३३ पदे
पदवीधर शिक्षक – ३३ पदे
उर्दू माध्यम एकूण पदांची संख्या- 66

मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमातून एकूण 327 पदांची भरती केली जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ –
https://www.pcmcindia.gov.in/marthi/

अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1yBdWU7ffvN22bGl9JJ-q_lEaluhiSRxz/view

शैक्षणिक पात्रता

  1. सहाय्यक शिक्षक-
    सहाय्यक शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवार हा एचएससी, – डी.एड. धारक असावा.
  2. पदवीधर शिक्षक
    या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे HSC- D.Ed, B.Sc- B.Ed (विज्ञान विषय) पदवी असावी.
    तसेच इच्छुक उमेदवारांकडे H.Sc. डी.एड, बी.ए. बीएड (भाषा विषय) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख – 16 एप्रिल 2024 आहे.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड

अर्ज करण्याची प्रक्रिया >>> येथे क्लिक करा

This post was last modified on %s = human-readable time difference 10:45 am

Davandi: