पेटीएमने जी फास्ट सर्व्हिस लॉन्च केली आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
Paytm पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन आणि फास्ट अशी सर्व्हिस लॉन्च केली आहे. पेटीएम हे एक ऑनलाईन व्यवहार करण्याचे माध्यम आहे. यावरून तुम्ही रिचार्ज, गॅस बुकिंग ,फास्टटॅग, इलेक्ट्रिसिटी बिल अशी अन्य काम यावरून करू शकता. तर पेटीएमने जी फास्ट सर्व्हिस लॉन्च केली आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
Paytm पेमेंट्स बँक लिमिटेड ने आपल्या ग्राहकांसाठी UPI Lite ही फास्ट सर्व्हिस लॉन्च केली आहे. या फीचरमुळे वापरकर्ते पिन शिवाय लहान लहान किंमतीच्या UPI व्यवहार करण्यासाठी परवानगी देणार आहे. यासह वापरकर्ते पेटीएम लाईट सेवेसह एका क्लिकवर पेमेंट करू शकणार आहेत. तेच रिअल टाइम पेमेंट करू शकणार आहेत.
हे ही वाचा :- पेटीएम ‼️ऑफर‼️ ऑफर‼️पेटीएम
UPI Lite
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे हे युपीआय लाईट डिझाईन करण्यात आले आहे. UPI लाईट आरबीआयने सप्टेंबर २०२२ मध्ये लॉन्च केले होते. नवीन उपक्रमाला चालना देण्यासाठी पेटीएम बँकेने सांगितले की , अशा प्रकारची UPI लाईट सर्व्हिस सुरु करणारी पहिली पेमेंट बँक आहे.
Paytm म्हणाले की, UPI Lite हे फीचर थेट वापरता येते. ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लहान लहान व्यवहारांसाठी सक्षम केली आहे. नवीन सर्व्हिस मदतीने एका क्लिकवर फास्ट पेमेंट करता येणार आहे. कंपनी देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे.
हे ही वाचा :- क्लिक करून पेटीएम Download करा.
PAYTM : पेटीएमच्या नवीन सर्व्हिसच्या मदतीने वापरकर्ते एकाचवेळी २०० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. तर वापरकर्ते पेटीएम लाईट वॉलेट मी दोन वेळा २००० रुपये हणजे जास्तीत जास्त ४००० ऍड करता येतील. या फीचरमुळे वापरकर्ते पिन न टाकता सुद्धा पेमेंट करू शकणार आहेत.