X

Pan Card Update : क्यूआर कोडसह येतंय नवीन पॅनकार्ड 2.0, जुन्या पॅनकार्डचं काय होणार?

Pan Card Update

Pan Card Update : क्यूआर कोडसह येतंय नवीन पॅनकार्ड 2.0, जुन्या पॅनकार्डचं काय होणार? सध्या तुमच्या पर्समध्ये असलेलं पॅनकार्ड लवकरच जुनं होणार आहे, आणि त्या पॅनकार्डची जागा पॅनकार्ड 2.O घेणार आहे.

पॅन 2.O या प्रकल्पाला कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडून मंजुरी मिळाली आहे.

पण घाबरू नका या नव्या 2.0 पॅनकार्डसाठी तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा नाही, किंवा या अपग्रेडसाठी कुठेही अतिरिक्त पैसेही द्यावे लागणार नाही.

सरकारनं दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे जुनं पॅनकार्ड आहे त्यांना काहीही बदलण्याची गरज नाही. यासाठीची प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करावी लागणारे.

हे पॅन कार्ड ‘कॉमन बिझनेस आयडेंटिफायर’ म्हणूनही विकसित केलं जाईल, म्हणजेच तुम्ही हे पॅनकार्ड वेगवेगळ्या व्यवसायांसाठी ओळख क्रमांक म्हणूनही वापरू शकणार आहात.

अर्थ मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकानुसार, सध्याचं पॅनकार्ड हे पॅन 2.0 आल्यावरही वैध राहील. जुन्या पॅन धारकांना नवीन कार्डसाठी अनिवार्यपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही मात्र ते त्यांचं पॅन विनामूल्य अपग्रेड करू शकतील.

पॅन नंबर आणि बाकी सगळे तपशील हे जुन्या पॅनवर आहेत तेच राहतील. क्यूआर असलेलं पॅन हे नागरिकांना विनामूल्य मिळेल आणि ई-पॅन नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवला जाईल.

Pan Card Update : प्रत्यक्ष प्लास्टिकच्या पॅनकार्डसाठी, अर्जदाराला 50 रुपये भरावे लागतील. तुम्ही भारताबाहेर राहात असाल तर तुम्हाला घरपोहोच कार्ड मिळेत मात्र त्यासाठी 5 रुपये अधिक पोस्टल शुल्क आकारलं जाईल.

यासाठी सरकारनं साधारण 1400 कोटी रुपये खर्च केलेत.

‘कॉमन बिझनेस आयडेंटिफायर’ म्हणजे काय?


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, उद्योग आणि व्यावसायिक जगताकडून ‘कॉमन बिझनेस आयडेंटिफायर’ असण्याची मागणी होत आहे जेणेकरून व्यापाऱ्यांना व्यवसायाशी संबंधित कामांसाठी वेगवेगळे नंबर किंवा कार्ड ठेवावे लागणार नाहीत.

केंद्रीय मंत्री अश्विनी म्हणाले, “आम्ही हे समान ओळखपत्र म्हणून वापरता येईल का हे पाहण्याचाही प्रयत्न करणार आहोत.

सध्याचं सॉफ्टवेअर 10-15 वर्षे जुनं असल्यानं त्यासाठी एक नवं पोर्टल तयार केलं जाईल. आणि सोबतच यासाठी नवं तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे.”

>>>> महिलांसाठी 11 हजार रुपये पगार आणि जेवण..

>>>> तुमच्या गावात महा ई सेवा केंद्र सुरू करायचे

This post was last modified on November 28, 2024 9:37 am

Davandi: