X

PAN -AADHAR : पॅन कार्ड आधार शी लिंक आणि जनतेची लूट

पॅन कार्ड आधार शी लिंक करा नाहीतर उपाशी रहा… पण १००० रुपये लिंक करायची फी भरा…. मनाला वाटेल असा कायदा काढतात.

आयकर विभागाने याबाबत जनजागृती केली पाहिजे…. सर्व सामान्य जनतेची लूट करणे बरं नाही.. गाव खेड्यातील लोकांना याबद्दल माहिती आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे..

त्यांना पॅन कार्ड आधार शी कसे लिंक करायचे हे तरी कळणार आहे का याचा विचार केला पाहिजे. अहो स्मार्ट फोन वापरणारे सर्वच लोक काही सुशिक्षित शिकलेले असतील हा गैर समज काढून टाकला पाहिजे.

हे ही वाचा : आधार-पॅन कार्ड लिंकिंगबाबत मोठी बातमी

आपल्या देशाची लोकसंख्या १५० कोटी इतकी आहे त्यातील आत्ता पर्यंत फक्त ५० कोटी लोकांनी पॅन कार्ड आधार शी लिंक केले आहे. म्हणजे अजून भारतात १०० कोटी लोक बाकी आहेत.

विचार करा एक व्यक्ती कडून १००० रू आकारण्यात येणार आहे. मग १०० कोटी जनता गुणिले १००० रुपये म्हणजे सरकार ला एक लाख कोटी रुपये म्हणजे १००,००,००,००,००० यातून मिळणार आहेत .

प्रशासन लोकांच्या तोंडाचा घास हिरावून घेत आहे. मुख्यमंत्री महोदय आणि बाकी सगळे पक्षाचे आमदार खासदार अजून झोपले आहेत. हा मुद्दा वापरा पुढच्या वर्षी निवडणूक आहे .

नाहीतर एक काम करा इडी , आयकर विभाग, अजून काही खाती असतील तर या सर्व सामान्य मध्यम वर्ग आणि गाव खेड्यात राहणाऱ्या लोकांवर चौकशीचे आदेश द्या.. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मोठ मोठ्या जाहिरात प्रसिद्ध करत आहेत…

कदाचित ही जाहिरात करण्यासाठी विसरले ……..असे वाटते…. कृपया कोणीतरी त्यांना आठवण करून द्या…. जागो ग्राहक जागो.

पटत असेल तर स्वतः शेअर करा….
नाहीतर गप्प बसू अन्याय सहन करा …

या पलीकडे तुम्ही काहीही करू शकत नाही….स्वतःच्या हक्कासाठी लढा……

This post was last modified on March 30, 2023 11:27 am

Davandi: