शिक्षक पदभरतीबाबत प्रसिध्दीपत्र
पवित्र पोर्टलवर दिनांक ०५/०२/२०२४ जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्यांची निवेदने ईमेलवर प्राप्त झाली आहेत. सदर निवेदनांची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवारांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याचे दिसून आले आहे. याबाबतच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले आहे. आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत.
अशा पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे जनरेट झालेले प्राधान्यक्रम डिलीट करुन नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे. तदनंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जरनेट होतील याची नोंद घ्यावी.
शिक्षक पदभरती : एकूण जागा कास्ट नुसार ,गटा नुसार तसेच माध्यम नुसार
i. काही बी.एस्सी पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमेस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑरगॅनिक केमेस्ट्री, इनऑरगॅनिक केमेस्ट्री, फिजीकल केमेस्ट्री इत्यादी अशा नोंदी केल्या आहेत.
ii. काही एम.एस्सी पदव्युत्तरपदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे सदरचे विषय केमेस्ट्री, बायोलॉजी असे नमूद केले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी केमेस्ट्रीच्या बाबतीत ऑरगॅनिक केमेस्ट्री, इनऑरगॅनिक केमेस्ट्री, फिजीकल केमेस्ट्री अशी नोंद केली नाही. तसेच बायोलॉजी विषयाच्याबाबतीत झुलॉजी, बॉटनी अशी नोंद केली नाही.
iii. काही एम.कॉम. पदव्युत्तरपदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तरपदवीचे विषय बैंकिग, इकॉनॉमीक्स, बिझीनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते.
उपरोक्त । ते iii विषयांच्या उमेदवारांना आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत.
हेही वाचा : PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का ? मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात
काही उमेदवारांना इ. ९ वी ते १२ वी करिता खाजगी व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट झाले नसल्याचे दिसून येत आहे. या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येत आहे.
प्राप्त ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात वरील बाबींशी संबंधित असलेल्या ईमेलमधील अडचणीचे निराकरण झालेले आहे. ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतिक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यालयामध्ये अभियोग्यताधारकांनी गर्दी करु नये. केवळ ई-मेलचा वापर करावा, ईमेलद्वारे जास्तीत जास्त शंकांचे निरसन केले जाईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 7:49 am