X

News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी : 8 जून 2023

● खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर.

▪️ हवामान विभागाने येत्या 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.

▪️ औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्याची मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहराचं नाव काय असणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

▪️ Google, Temasek, and Bain & Company यांनी दिलेल्या एका अहवालानुसार भारताची इंटरनेट इकोनॉमी 17 मिलियन डॉलर्सने वाढून 2030 पर्यंत तब्बल 1 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्राहकांची वाढती संख्या आणि वापर याद्वारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

▪️ ऑलम्पिक विजेत्या कुस्तीपटूंनी सुरु केलेले आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित करत असल्याची माहिती कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी दिली. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 15 जूनपर्यंत पोलिसांची चौकशी पूर्ण होईल तोवर आम्ही थांबू असे बजरंग पुनिया यांनी सांगितले.

▪️ होंडा कंपनीने आपल्या 75 वर्धापनदिनानिमित्त ‘होंडा एलिवेट’ ही नवीन कार लाँच केली आहे. या कारच्या फीचर्सने क्रेटा आणि सेल्टॉस सारख्या एसयूव्ही कार्सला मागे टाकले आहे. दरम्यान भारतात लवकरच या कारचे बुकिंग सुरु होणार आहेत, असेही होंडा कंपनीने म्हटले आहे.

▪️ आदित्य बिर्ला समूह ब्रँडेड दागिन्यांच्या रिटेल व्यवसायात उतरणार यासाठी समूह जवळपास ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ‘नॉव्हेल ज्वेल्स’ नावाच्या नवीन व्हेन्चर अंतर्गत हा व्यवसाय केला जाणार असल्याचं समूहाकडून जाहीर करण्यात आले आहे.

● अखेर जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्तपदी 6 जेजुरी ग्रामस्थ अन् बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार.

● हॉस्टेलमधील मुलीच्या हत्येनंतर सरकार अलर्ट मोडवर, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश.

● कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक.

● कोल्हापुरातील राड्यानंतर इंटरनेट सेवा 31 तासांसाठी बंद, अफवा पसरू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय.

● विरोधकांकडून दंगलीचा इशारा आणि त्याला प्रतिसादाच्या कनेक्शनची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

● जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहन देत आहेत, कोल्हापुरातील प्रकारावरुन शरद पवारांचा गंभीर आरोप.

● राज्यात तणावाची स्थिती; गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या; काँग्रेसची मागणी, ठाकरे गटानेही साधला निशाणा.

● मान्सूनचं आगमन आणखी लांबणीवर; अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, तर सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज.

● WTC Final : पहिला दिवस ट्रेविस हेड आणि स्मिथ यांनी गाजवला, पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने तीन विकेटच्या मोबदल्यात 327 धावा केल्या आहेत. शतकवीर ट्रेविस हेड 146 तर स्मिथ 95 धावांवर खेळत आहेत.

This post was last modified on %s = human-readable time difference 3:24 am

Davandi: