X

News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 19 मे 2023

● किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली, अर्जुन राम मेघवाल आता देशाचे नवे कायदामंत्री.

● माळरानावर पुन्हा भिर्रर्र…; सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतील जलीकट्टू आणि कर्नाटकातील कांबळा वरील बंदी हटवली

● अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थावर उपलब्ध.

● कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; 20 मे रोजी शपथविधी, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा.

● कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य.

● विधानसभा, लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर फोकस करा, शरद पवारांच्या सूचना; राष्ट्रवादीच्या बहुतांश लढती शिवसेनेसोबत.

● ” आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना राजस्थान, महाराष्ट्रात पाठवण्याचा विचार करा”; चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त, केंद्र सरकारलाही खडसावलं.

● तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न; भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण.

● अचानक उष्णता वाढण्याचं कारण ‘एल निनो’; NASAचा रिपोर्ट जाहीर.

● IPL 2023 : विराट कोहलीचे वादळी शतक, RCB चा हैदराबादवर 8 विकेटने विजय, क्लासेनचे शतक व्यर्थ.

This post was last modified on %s = human-readable time difference 2:54 am

Davandi: